पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळमध्ये पूरबळींचा आकडा ८८ वर; ४० जण बेपत्ता

केरळ पूर

अतिवृष्टीनंतर आलेल्या पूराने केरळमध्ये थैमान घातले आहे. या पूराचा फटका केरळच्या १४ जिल्ह्यांना बसला आहे. या जिल्ह्यांमधील अनेक गावं पाण्याखाली गेली असून नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या महापूराने केरळमध्ये गेल्या ५ दिवसांमध्ये ८८ लोकांचा बळी घेतला आहे. तर ४० लोकं बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन मंगळवारी पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी तिरुवनंतपूरमला रवाना झाले आहेत. ते सर्वात आधी वायनाड येथील पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.

इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; नितीन गडकरी करत होते प्रवास

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आलेल्या महापूराने हाहाकार माजवला आहे. या महापूरामध्ये राज्यातील १४ जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. पूरामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. घरामध्ये असलेले संसार उपयोगी साहित्य पूराच्या पाण्यामध्ये वाहून गेली. केरळ सरकारने ५ जाहीर केलेल्या ५ दिवसांच्या आकडेवारीमध्ये आतापर्यंत ८८ लोकांचा मृत्यू झाला. तर ४० लोकं बेपत्ता झाली आहेत. 

'मुख्यमंत्री कोल्हापुरात राहिले असते तर प्रशासनाला गती आली 

केरळमधील पूराचा फटका २ लाख ८७ हजार नागरिकांना बसला आहे. १ हजार ६५४ छावण्यांमध्ये या सर्व नागरिकांना ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली आहे. केरळमधील सर्वाधिक पूरबळी तीन जिल्ह्यांमध्ये गेला आहे. मलप्पुरम जिल्ह्यामध्ये २९ जणांचा, काझीकोड जिल्ह्यामध्ये १७ जणांचा तर वायनाडमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

घुसखोरीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो दहशतवादी दाखल

सतत पडणाऱ्या पावसाने केरळमध्ये सोमवारी थोडी विश्रांती घेतली होती. मात्र पूरस्थिती कायम होती. दरम्यान, पुढच्या तीन दिवसांमध्ये केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, या पूरामुळे केरळमधील १८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पूराचा फटका ८१ हजार शेतकऱ्यांना बसला आहे. तर पूरामध्ये ८०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. 

दिल्लीः IGI विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाला अटक