पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अत्यंत दुर्मिळ मासा गळाला लागला, पहा पुढे मच्छिमारांनी काय केलं

अत्यंत दुर्मिळ मासा गळाला लागला

समुद्रात अत्यंत दुर्मिळ आणि जवळपास विलुप्त होत चाललेल्या प्रजातींचे  असंख्य मासे आढळतात. अनेकदा मासेमारी करताना मच्छिमारांच्या गळाला हे दुर्मिळ मासे लागतात. मात्र त्यातल्या काही माशांचा हा जाळ्यात अडकून मृत्यूही झालेला असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केरळमधला असल्याचं समजत आहे. या मच्छिमारांच्या गळाला अत्यंत दुर्मिळ शार्क मासा लागला. 

मुंबईकरांचे वर्षातील ८ दिवस १७ तास ट्रॅफिक जॅममध्येच...

शार्कची ही प्रजती जवळपास विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या गोष्टीची माहिती असलेल्या मच्छिमारांनी या दुर्मिळ शार्कला पुन्हा समुद्रात सोडले. शार्क मासा मोठा असल्यानं मच्छिमारांना तो पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी अडचणी येत होत्या. शार्कच्या शेपटीच्या माऱ्यामुळे एक मच्छिमाराला जखमही झाली. 

रजनीकांतनंतर अक्षय कुमारही दिसणार Man vs Wild मध्ये

मात्र मच्छिमारांनी आपले प्रयत्न थांबवले नाही. अखेर दोरीच्या साह्यानं जहाजाच्या डेकवर आलेल्या मोठ्या दुर्मिळ शार्क माशाला मच्छिमारांनी जीवनदान दिले. म्हणूनच अनेक प्राणीप्रेमींनी या मच्छिमारांचं कौतुक केलं आहे.

बेस्ट प्रशासनाचा मोठा निर्णय, सहा महिन्यांत अंमलबजावणी