पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार

शशी थरुर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केल्यामुळे काँग्रेस खासदार शशी थरुर अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर आता केरळ काँग्रेसने त्यांच्याकडे खुलासा मागितला आहे. पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामाचे कौतुक करायला हवे, असे शशी थरुर यांनी म्हटले होते. 

परदेश दौऱ्यावरुन परतताच मोदी जेटलींच्या घरी, वाहिली श्रद्धांजली

त्यांच्या या भूमिकेबद्दल केरळ काँग्रेसचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंशा करण्याबात थरुर यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर त्यांच्यावर काय कारवाई करावी, याचा विचार केला जाईल. थरुर यांचे वक्तव्य दुर्देवी आहे, असा उल्लेखही मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी केला आहे. मोदी सरकारच्या चुंकाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशा शब्दांत विरोधी नेता रमेश चेन्नीतला यांनी विधानसभेत थरुर यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली.  

अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर होणार?, RBI सरकारला देणार १.७६ लाख कोटी

थरूर आणि त्यांचे सहकारी अभिषेक मनु सिंघवी यांनी मागील आठवड्यात काँग्रेसचे नेता जयराम रमेश यांचे समर्थन करताना मोदींच्या चांगल्या कामाची प्रशंसा करायला हवी, असे म्हटले होते. केंद्र सरकार जनतेच्या हितसंबंधातील कोणतेही निर्णय सद्यस्थितीला घेत नाही. सरकारच्या या भूमिकेचा थरुर यांनी नेहमीच विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोदींच्या एखाद्या चांगल्या कार्याचा गवगवा करण्याची गरज नाही, असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Kerala Congress seek an explanation from Shashi Tharoor for praising Prime Minister Narendra Modi