पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळमध्ये आढळला 'कोरोना'चा आणखी एक रुग्ण

केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांसाठी विशेष वॉर्ड सुरु करण्यात आले आहे. (PTI)

चीनच्या वुहानमध्ये पसरलेल्या घातक कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजारहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. दरम्यान, केरळमध्ये आणखी एक कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण सातत्याने चीनमध्ये जात असतो, अशी माहिती समजते. या रुग्णाला वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

केरळमधील दुसरे प्रकरण

केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले हे दुसरे प्रकरण आहे. केरळमधील जो रुग्ण कोरोना विषाणूने संक्रमित झाला आहे. तो चीनच्या वुहान विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

राज्य सरकारने केले सावध

देशात कोरोना विषाणूचे प्रकरण समोर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी केरळ सरकारने राज्यातील लोकांना सावधनतेचा इशारा दिला असला तरी घाबरण्याचे काही कारण नसल्याचे म्हटले आहे. केरळच्या शहरी आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी आरोग्य विभागाला अलर्ट राहण्यास सांगितले आहे.