या वर्षांतील अखेरचं सूर्यग्रहण पाहण्याचा आज योग आहे. सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ झाला आहे. भारतात केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे. केरळमधील चेरुवथूरमध्ये पहिलं कंकणाकृती सूर्यग्रहण दिसलं आहे.
आजचे राशिभविष्य | गुरुवार | २६ डिसेंबर २०१९
हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी वैज्ञानिक, खगोलप्रेमी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चेरुवथूरमध्ये जमले आहेत. केरळमध्ये ८ वाजून ५ मिनिटे ते सकाळी अकरा वाजेपर्यंत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहण्याचा सल्ला वैज्ञानिकांनी सर्वांना दिला आहे. कोईमतूर, तिरूचिरापल्ली, मंगळुरूमध्ये सौरकंकण दिसेल. भारताच्या अन्य भागांत ते खंडग्रास दिसेल.
सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्य चंद्रामुळे झाकोळलेला दिसेल. १०.४८ वाजता ग्रहणाचा मध्य असेल. दुपारी १.३६ वाजता ग्रहण संपणार आहे. संपूर्ण ग्रहणाचा अवधी हा ३ मिनिटे ३४ सेकंद असेल.
मग काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम नाही का? प्रकाश आंबेडकर
मात्र राज्याच्या अनेक ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासच 'ग्रहण' लागले आहे. राज्यात पुढचे दोन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.