पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३७० वरून अमेरिकेतील काश्मिरी पंडीत भावूक, मोदींच्या हाताचा घेतला मुका!

३७० वरून अमेरिकेतील काश्मिरी पंडीत भावूक, मोदींच्या हाताचा घेतला मुका! (ANI)

अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारतीय समुदायाच्या लोकांनी जंगी स्वागत केले. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमापूर्वी शीख समुदाय, काश्मिरी पंडित आणि बोहरा समाजाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. शीख समाजाने एकीकडे काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे मोदींचे कौतुक केले तर दुसरीकडे कर्तारपूर कॉरिडॉरसाठी आभारही मानले. दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या एका प्रतिनिधी मंडळानेही मोदींची भेट घेतली. त्यावेळी एक काश्मिरी पंडित व्यक्ती खूप भावूक झाल्याचे दिसून आले. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आनंदी असलेल्या या सदस्याने मोदींचे आभार मानत त्यांच्या हाताचे चुंबन घेतले. 

वीज चमकल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला धक्का, कर्मचारी जखमी

शीख समुदायातील मंडळींनी पंतप्रधान मोदींना एक निवेदनही दिले. त्यामध्ये १९८४ च्या शीख विरोधी दंगल, भारतीय संविधानातील कलम २५ आणि आनंद मॅरेज एक्ट, व्हिसा आणि पासपोर्ट सारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून गुरु नानक देव आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची मागणी केली आहे.

कॅलिफोर्निया, अर्विनचे विद्यमान आयुक्त अरविंद चावला म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींनी एक निवेदन दिले आहे. मोदींनी शीख समाजासाठी जे काही केले आहेते, त्यासाठी त्यांचे आभारी आहोत. आम्ही कर्तारपूर कॉरि़डॉरसाठीही आभार मानले आहेत. हाऊडी मोदी शोमध्ये डोनाल्ड ट्रम्प हेही येत आहेत. यावरुन मोदी हे किती महत्वाचे नेते आहेत, हे समजते. 

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये उद्ध्वस्त झालेले 'जैश'चे दहशतवादी कॅम्प पुन्हा सुरु

पंतप्रधान मोदींची काश्मिरी पंडितांच्या एक शिष्टमंडळानेही भेट घेतली. या दरम्यान काश्मिरी पंडित भाऊक झाल्याचे दिसून आले. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे खूश असलेल्या एका सदस्याने पंतप्रधान मोदींच्या हाताचे चुंबन घेत, ७ लाख काश्मिरी पंडितांकडून तुमचे आभारी असल्याचे म्हटले. मोदींनी त्यांची विचारपूस केल्यानंतर म्हटले की, तुम्ही लोकांनी जे कष्ट घेतले आहेत, ते कमी नाहीत. यादरम्यान काश्मिरी पंडितांनी 'नमस्ते शारदा देवी' श्लोक म्हटला. त्यानंतर अखेरीस मोदी यांनी 'अगेन नमो नम:' असे म्हणताच सर्वजण हास्यात बुडून गेले.