पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काश्मीरमधील नजरकैदेतील राजकीय नेत्यांची टप्याटप्याने सुटका'

फारूख खान माहिती देताना

कलम ३७० रद्द केल्यानंतर ताब्यात असलेल्या काश्मीरमधील नेत्यांची टप्याटप्याने सुटका केली जाईल, अशी माहिती जम्मू-काश्मीरमधील राज्यपालांच्या सल्लागाराने गुरुवारी एएनआयला दिली. नेत्यांची सुटका करण्याआधी परिस्थितीचे पूर्ण विश्लेषण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार फारुख खान म्हणाले, होय, एका मागून एक सर्व नेत्यांची सुटका केली जाईल. पण त्याआधी परिस्थितीचे विश्लेषणही करण्यात येईल. जम्मूमधील नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील नेत्यांचीही सुटका केली जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना फारूख खान यांनी वरील माहिती दिली.

काश्मीरमधील राजकीय नेते गेल्या दोन महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन यांना ५ ऑगस्टपासून त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 

अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल राखीव

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फारूख खान म्हणाले की कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविलेली नाही. पण केवळ सुरक्षेच्या दृष्टीने जास्त जवान तैनात करण्यात आलेले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kashmiri leaders to be released from detention one by one after analysis Advisor to J and KGovernor