पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'..तर १०० व्या स्वातंत्र्यदिनी काश्मीर भारताचा भाग नसेल'

..तर १०० व्या स्वातंत्र्यदिनी काश्मीर भारताचा भाग नसेल- वायको

काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अशी वक्तव्ये करण्यात राजकीय नेते आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आता यात तामिळनाडूतील एमडीएमके पक्षाचे प्रमुख वायको यांची भर पडली आहे. जेव्हा देश १०० वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत असेल. त्यावेळी काश्मीर भारताच भाग नसेल, असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. भाजपने काश्मीरला खड्ड्यात ढकलले आहे. मी काश्मीरबाबत यापूर्वीही माझे विचार मांडलेले आहेत, असेही त्यांनी म्हटले. याबाबत 'एएनआय'ने वृत्त दिले आहे.

घुसखोरीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो दहशतवादी दाखल

राज्यसभा सदस्य वायको हे तिरुवन्नमलई जिल्ह्यात आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी जेव्हा कलम ३७० हटवण्याचा संकल्प राज्यसभेत सादर करण्यात आला होता. त्यावेळीही वायको यांनी याचा विरोध करत हा अत्यंत दुःखी दिवस असल्याचे म्हटले होते. काश्मिरी लोकांना दिलेले वचन तोडण्यात आल्याचे ते म्हणाले होते. 

वायको हे यापूर्वीही आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नईतील एका न्यायालयाने त्यांना श्रीलंकेतील दहशतवादी संघटना लिट्टेचे समर्थन केल्याप्रकरणी देशद्रोहाचा दोषी ठरवले होते. नंतर न्यायालयाने यावरील शिक्षेसा स्थगिती दिली होती.

लडाख सीमेवर पाकच्या हालचाली तीव्र, विमानं तैनात

इतकेच नव्हे तर वायको यांनी मागील महिन्यात हिंदी भाषेवरुनही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि बहुताश खासदारांच्या हिंदीत बोलण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. हिंदीमुळे संसदेतील चर्चेचा स्तर घटला आहे. ते फक्त हिंदीत आरडाओरड करतात. पंतप्रधान मोदी हेही संसदेत फक्त हिंदीतच भाष्य करतात. माझ्या नजरेत हिंदी बोलण्यामागे पंतप्रधानांची भावना ही हिंदी, हिंदू, हिंदू राष्ट्र हीच आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

जम्मू काश्मीर, लडाखमधील विकासासाठी रिलायन्स पुढाकार घेणार