पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१४ दिवसांनंतर श्रीनगरमध्ये आजपासून सुरु होणार शाळा

१४ दिवसांनंतर श्रीनगरमध्ये आजपासून सुरु होणार शाळा

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर खबरदारी म्हणून बंद केलेल्या श्रीनगरमधील १९० हून अधिक प्राथमिक शाळा सुमारे १४ दिवसांनंतर आजपासून (सोमवार) सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरी असलेली मुले पुन्हा एकदा आपल्या दप्तरांबरोबर शाळेत दिसतील. उच्च माध्यमिक शाळा आणखी काही काळ बंद राहतील. सुटीच्या काळात बुडालेला अभ्यासक्रम नंतर पूर्ण केला जाणार आहे. सामान्य स्थिती होताच इतर जिल्ह्यातील शाळाही सुरु केल्या जातील. दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लष्करासह सैन्य दल २४ तास दक्ष आहेत.

जम्मूत ५ जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता केवळ श्रीनगरमधील प्राथमिक शाळा सुरु होतील. ज्या भागात शाळा सुरु होणार आहेत. त्यामध्ये लासजान, सांगरी, पंथ चौक, नौगाम, राजबाग, जवाहर नगर, गंगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंगचा समावेश आहे. परिस्थिती सामान्य होताच हळूहळू इतर क्षेत्रातील शाळा सुरु होतील. काश्मीर खोऱ्यात निर्बंध सैल करण्यात आले आहेत. स्थानिक अधिकारी आढावा घेत आहेत. लवकरच आणखी काही भागातील निर्बंध हटवले जातील. 

JNUला मोदींचे नाव द्या, भाजप खासदाराची मागणी

विद्यार्थ्यांची सुरक्षा जिल्हा प्रशासनाची मुख्य चिंता आहे आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू परिसरातील ५ जिल्ह्यात रविवारी सकाळपासून मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यापूर्वीपासून काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणची २ जी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ४ ऑगस्टपासून बंद असणारी इंटरनेट सेवा शुक्रवारपासून पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आली होती. मात्र २४ तास उलटल्यानंतर ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली.

'गांधी-नेहरु परिवाराशिवाय काँग्रेस चालवणे कठीण'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kashmir Valley 50 Police Station Mobile internet services temporarily disconnected in Jammu