पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमधील जनजीवन सुरळित होण्यास पाकचा अडथळाः अजित डोवाल

अजित डोवाल

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती खूप चांगली आहे. अपेक्षेपेक्षाही परिस्थिती चांगली आहे, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी व्यक्त केले आहे. ६ ऑगस्टला एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्याला गोळी लागली नव्हती. शवविच्छेदन अहवालात अवजड वस्तू लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत दहशतवाद प्रभावित परिसरात एकाच ठिकाणी दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान काश्मीरमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. २३० पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाहण्यात आले आहे. यातील काही पळून जाण्यात यशस्वी झाले असून काहींना लष्कराने अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लहान मुलीसह चौघे जखमी

ते म्हणाले, आम्ही सर्व निर्बंधांवर पाकिस्तानची प्रतिक्रिया पाहू इच्छितो. जर आम्ही प्रतिक्रिया दिली तर पाकिस्तान घुसखोरी बंद करतो. जर पाकिस्तान आपल्या टॉवरवरुन ऑपरेटर्सना सिग्नल पाठवणे बंद केले तर आम्ही सर्व निर्बंध उठवू. अडीच वर्षांची मुलगी आसमा जान ही शुक्रवारी सोपोर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाली होती. तिची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात आणण्याच्या सूचना दिली असल्याचे डोवाल यांनी सांगितले. 

विक्रम लँडर चंद्रावर उतरलेला असू शकतो, थोडा धीर धरा, इस्रोच्या माजी प्रमुखांचे मत

पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून काश्मिरी लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेत्यांच्या नजरकैदेबाबत ते म्हणाले की, सर्वकाही कायद्यानुसार केले गेले आहे. ते आपल्या नजरकैदेबाबत न्यायालयात आव्हान देऊ शकतात. जम्मू आणि काश्मीरमधील भौगौलिक क्षेत्राच्या ९२.५ टक्के भाग निर्बंधापासून मुक्त असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kashmir situation: National Security Advisor Ajit Doval says Pakistan is trying to create trouble in kashmir