पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर पर्यटकांसाठी खुले

जम्मू- काश्मीर आजपासून पर्यटकांसाठी खुले

गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटक आणि यात्रेकरुंसाठी बंद असलेलं काश्मीर आजपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं २ ऑगस्ट रोजी पर्यटक आणि यात्रेकरुंना तातडीनं माघारी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी काश्मीरमधलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बिग बॉस अश्लील कार्यक्रम, तातडीने बंद करण्याची मागणी

त्यामुळे ऑगस्टपासून काश्मीर हे पर्यटकांसाठी बंद होतं. मात्र १० ऑक्टोबर पासून ते पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना  जम्मू-काश्मीरमधून  माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने दोन महिन्यांपूर्वी जारी केलेला  आदेश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मागे घेतला होता.  मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार

कलम ३७० रद्द  करण्याच्या आधी पर्यटकांना सुरक्षेच्या कारणांवरून तातडीनं माघारी पाठवण्यात आलं होतं. मात्र आता काश्मीर पर्यटकांसाठी खुले झाले आहे.