पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये मृत्युमुखी पडल्याचं नाटक करुन रुग्णवाहिकेतून घर गाठण्याचा प्रयत्न

कोरोना विषाणू

देशात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींनी कठोर पाऊल उचलत काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनची घोषणा केली. देशातील सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा वगळता प्रवासबंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही काही लोक नवनव्या क्लूप्त्या  शोधून  जीव धोक्यात घालून बाहेर पडत  आहेत. जम्मू  काश्मीरमधील पुंछ भागात राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्याच मृत्यूचं खोटं  प्रमाणपत्र तयार करुन घेतलं आणि मृत्युमुखी पडल्याचं नाटक करुन रुग्णवाहिकेतून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी रुग्णवाहिका अडवली यात संबधीत व्यक्ती हा ठणठणीत बरा असून त्यानं रुग्णालयातील लोकांना लाच देऊन  प्रवास करण्याचा प्रयत्न केला असल्याचं उघड झालं. 

कोरोनाच्या हेल्पलाइनवर सामोसे मागणाऱ्याची खास 'प्रसादा'सह इच्छापूर्ती

हमाक दिन असं या व्यक्तीचं  नाव असून  त्याला सरकारी वैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याच आलं होतं. रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर आपल्या मूळ घरी परतण्यासाठी त्यांनं रुग्णालयातील तीन जणांना लाच देऊन स्वत:च्या मृत्यूचं खोटं  प्रमाणपत्र तयार करुन घेतलं. इतकंच नाही तर खासगी रुग्णवाहिका घेऊन तो घरी देखील निघाला होता. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी अर्ध्या वाटेत रुग्णवाहिका अडवली. यावेळी आतील व्यक्ती ही जिवंत असल्याचं पोलिसांना लक्षात आलं पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतलं आहे.

कोरोनाविरोधातील लढ्याचे नेतृत्त्व करणारी मराठमोळी व्यक्ती