पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरप्रश्नी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही, भारताने अमेरिकेला सुनावले

एस जयशंकर आणि माईक पॉम्पिओ

काश्मीर प्रश्नासंदर्भात कोणतीही चर्चा केवळ पाकिस्तानशी होईल. हा मुद्दा द्विपक्षीय चर्चेतूनच सोडविला जाईल, असे भारताकडून शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार आहोत, याचा पुनरुच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यावर लगेचच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या प्रश्नावर कोणत्याही तिसऱ्या देशाने मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचे सांगितले.

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

एशिआन परिषदेसाठी एस जयशंकर सध्या बँकॉकमध्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लगेचच त्यांनी ट्विट करून भारताची भूमिका मांडली. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काश्मीरप्रश्नी कोणतीही चर्चा फक्त द्विपक्षीय असेल. हे अमेरिकेतील माझ्या समकक्ष असलेल्या माईक पॉम्पिओ यांना स्पष्टपणे कळविले आहे. 

दरम्यान, 'व्हाईट हाऊस'मध्ये पत्रकार परिषदेत काश्मीर संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, जर त्यांना या प्रश्नावर कोणी मदत करावी असे वाटत असेल. तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. या संदर्भात मी पाकिस्तानशी बोललो आहे. भारताशी माझे मोकळेपणाने बोलणे झाले आहे. जर त्यांना वाटत असेल, तर मी लक्ष घालण्यास तयार आहे.

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

ट्रम्प यांच्या या विधानानंतर काश्मीरप्रश्न कोणत्याही देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले.