पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः मोस्ट वाँटेड दहशतवादी जाकीर मुसाचा खात्मा

जाकीर मुसा

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट करण्याच्या अभियानात गुंतलेल्या सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे सैन्यदलाने मोस्ट वाँटेड दहशतवादी जाकीर मुसाला कंठस्नान घातले आहे. हिज्बुल कमांडर बुरहान वानीच्या खात्म्यानंतर दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय बनलेल्या जाकीर मुसाने आभियांत्रिकीचे शिक्षण सोडून इस्लामिक राज्याच्या स्थापनेसाठी युद्धाचा मार्ग अवलंबला होता. तो दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत अन्सार गजावत-उल-हिंदचा प्रमुख होता. 

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती- धनंजय मुंडे

काश्मीर खोऱ्यात लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे मोस्ट वाँटेड दहशतवादी जाकीर राशीद भट्ट उर्फ जाकीर मुसाला एनकाऊंटरमध्ये मारले. दहशतवादी संघटनी अन्सार गजावत-उल-हिंदचा प्रमुख मुसाचा पुलवामातील त्याच ठिकाणी खात्मा केला. जिथे २०१६ मध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीचा खात्मा झाला होता. भारतीच सेनेच्या नॉर्दर्न कमांडने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

काश्मीर खोऱ्यात लष्कराने गुरुवारी दुपारी पुलवामातील त्राल येथे जाकीर मुसा उपस्थितीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ४२ राष्ट्रीय राइफल्स, जम्मू-कश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरु केली. एका घरात लपून बसलेल्या मुसाला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्याने सुरक्षादलावर ग्रेनेड फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत मुसा ठार झाला. 

जाकीर मुसा हा टेक्नोसॅव्ही होता. त्याला काश्मीर खोऱ्यातील पोस्टर बॉय म्हटले जात. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुसाच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली होती. काश्मीर खोऱ्यात सुरक्षादलांवर हल्ला करण्याच्या अनेक प्रकरणात त्याचा समावेश होता.

जाकीर हा एका प्रतिष्ठित आणि संपन्न परिवारातील होता. त्याचे वडील अभियंता आहेत. २०११ मध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चंदीगडला गेला होता. तिथे त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. पण २ वर्षांनंतर म्हणजे २०१३ मध्ये त्याने अर्ध्यातूनच शिक्षण सोडले होते.