पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी अटक: कार्ती चिदंबरम

कार्ती चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पी. चिदंबरम यांना दिल्लीतील जोरा बाग निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. 'सीबीआयची कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. काही लोकांना खुश करण्यासाठी सीबीआय ऐवढे मोठे नाटक आणि तमाशा करत आहे, अशी टीका कार्ती चिदंबरमने केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची देखील ईडीने याआधी चौकशी केली आहे.

पी. चिदंबरम यांना आज सीबीआय कोर्टात केले जाणार हजर

दरम्यान,  कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली असल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. तसंच 'हे फक्त टीव्हीवर एक तमाशा निर्माण करण्यासाठी तसंच काँग्रेस पक्षाची आणि माजी अर्थमंत्र्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी केले गेले आहे. आम्ही याला राजकीय आणि कायदेशीर पध्दतीने लढा देऊ', असे देखील कार्ती चिदंबरम यांनी सांगितले. कार्ती चिदंबरम यांनी चेन्नई विमातळावर माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक

दरम्यान, याप्रकरणात आम्हाला अडकवण्यात येत आहे, असा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे. सीबीआयने अटक करण्यापूर्वी पी. चिदंबरम यांनी दिल्लीतील काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'माझ्यावर किंवा माझ्या कुंटुंबियांवर कोणतेही आरोपपत्र दाखल नाही. मी पळून गेलेलो नव्हतो. तर न्यायालयीन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मी माझ्या वकिलांसोबत होते. तसंच या प्रकरणाबाबतची सुनावणी सूचीबद्ध करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:karti chidambaram says It is being done just to divert attention from the issue of Article 370