पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करतारपूर कॉरिडॉर: दररोज ५ हजार भाविकांना विना व्हिसा प्रवेश मिळणार

करतारपूर कॉरिडॉरसंदर्भात भारत-पाक दरम्यान सकारात्मक चर्चा

भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय संबंधातील तणावपूर्ण वातावरणात करतारपूर कॉरिडोरचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भा दोन्ही राष्टांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. करतारपूर कॉरिडोरच्या मुद्द्यावर वाघा बॉर्डरवर पार पडलेल्या बैठकीत भारतीय प्रतिनिधीमंडळाने पाकसमोर आपल्या मागण्या ठेवल्या. यातील काही मागण्या पाकिस्तानने मान्य केल्या आहेत. 

करतारपूर कॉरिडोरचे काम लवकर पूर्ण करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत कॉरिडोरचा वापर सुरु करण्यात यावा, अशी मागणी भारताने केली आहे. उल्लेखनीय आहे की, गुरुनानक देव यांची ५५० वी जयंती आहे. प्रत्येक दिवशी पाच हजार भक्तांना दर्शनासाठी विना व्हिसा परवानगी मिळावी. खास दिवशी १० हजार भक्तांना प्रवेश मिळावा, अशी मागणी भारताकडून करण्यात आली.

भविष्यातील संघर्ष अधिक घातक आणि कल्पनेपलिकडचेः लष्करप्रमुख

दरम्यान भारताने रावी नदीवरील पूल बांधणीसंदर्भातील माहितीही यावेळी पाकिस्तानला दिली. पूल झाला नाही तर सध्याच्या बाबा नानक डेरा आणि आसपासच्या परिसरात पूराचा धोका असल्याचेही भारताने पाकिस्तानला पटवून दिले. पाकिस्तानकडून या पूलाला मंजुरी देण्यात आली असून पाकिस्ताननेही अशाप्रकारच्या पुलाची बांधणी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.