पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएम मोदी आणि सनी देओलने घेतला लंगरमध्ये जेवणाचा आस्वाद

पीएम मोदी आणि सनी देओल

गेल्या ७० वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या भारतीय शीखांची इच्छा आज पूर्ण झाली. गुरुनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आज भारत-पाकिस्तान दरम्यानची भिंत तुटली आहे. गुरुनानक यांचे पवित्र स्थळ असलेल्या डेरा बाबा नानक साहिब येथे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कर्तारपूर साहिब कॉरिडोरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी गुरदासपूरमधील डेरा बाबा नानक येथील बेर साहिब गुरुद्वारात गेले. यावेळी त्यांच्यासोबत गुरुदासपूरचे भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल देखील उपस्थित होता. यावेळी मोदींनी सनी देओलसोबत लंगरमध्ये जेवण केले. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनी देओलने देखील हा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

दरम्यान, कर्तारपूर साहिब कॉरिडोर उदघाटना वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले. भारताच्या भावनांना समजून घेतल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे आभार मानले. तसंच इंटिग्रेटेड चेकपोस्ट आणि कर्तारपूर साहिब कॉरिडोर उघडणे आपल्या सर्वांसाठी दुहेरी आनंद असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.