पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर'नाटक' सुरुचः आता सोमवारी मांडला जाणार विश्वासदर्शक ठराव

विधानसभा अध्यक्ष के आर रमेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची खुर्ची राहिल की जाईल, हे नाट्य अजून संपुष्टात आलेले नाही. गुरुवारी राज्यपाल वजुभाई वाला यांनी सांगितल्यानंतरही विधानसभाध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले नाही. त्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज दुपारी दीडची वेळ दिली होती. तीही वेळ निघून गेल्यानंतर राज्यपालांनी सांयकाळी सहाची वेळ दिली होती. पण त्यानंतरही विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया झाली नाही. विधानसभाध्यक्ष के आर रमेश यांनीही ही प्रक्रिया आजच संपुष्टात आणायची असल्याचे म्हटले होते. काँग्रेस-जेडीएसच्या सदस्यांनी सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कामकाज तहकूब करण्याची मागणी केली होती. अखेर विश्वासदर्शक ठराव आता सोमवारी पार पडणार आहे. याबाबतचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात, आता चर्चा खूप झाली

तत्पूर्वी, राज्यपाल विधानमंडळाचे लोकपाल म्हणून काम करु शकत नाहीत, असे कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देताना सभागृहात म्हटले होते. विधानसभाध्यक्ष रमेशकुमार यांनी विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विचार-विनिमय खूप झाला आहे. मला ही प्रक्रिया आज संपवायची आहे. मला जगाचा सामना करायचा आहे, असे ते म्हणाले होते.