कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यामध्ये काँग्रेसचे ११ आणि जेडीएसच्या तीन आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, नूतन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे सोमवारी आपले बहुमत सिद्ध करणार आहेत.
मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही: शरद पवार
'येडियुरप्पा यांनी उद्या (सोमवार) विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. अर्थ विधेयकाची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मी सर्व आमदारांना विश्वासदर्शक प्रस्तावासाठी सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन करतो,' असे विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी म्हटले
Karnataka Speaker KR Ramesh Kumar: BS Yediyurappa has asked me to oversee vote of confidence tomorrow. The Finance bill is set to lapse on July 31. I appeal to all MLAs to appear for the session for the confidence motion. pic.twitter.com/okAiP6VYQ5
— ANI (@ANI) July 28, 2019
आपण कुठं पोहोचलो आहोत? ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मला नैराश्य आले आहे, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, रमेशकुमार यांनी एचडी कुमारस्वामी सरकार कोसळल्याच्या दोन दिवसांनंतर गुरुवारी तीन आमदारांना अपात्र घोषित केले. रमेश ए जरकिहोळी, महेश कुमठल्ली आणि आर शंकर यांचा यात समावेश आहे.
बंडखोर आमदार २०२३ पर्यंत निवडणूक लढवण्यास अपात्र
ज्या आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले, त्यात रोशन बेग, आनंद सिंह, एच विश्वनाथ, एसटी सोमशेखर यांचा समावेश आहे. विधानसभेचा कार्यकाळ २०२३ पर्यंत आहे. याचाच अर्थ अपात्र आमदारांना विधानसभेची पोटनिवडणूकही लढवता येणार नाही.