कर्नाटकातील राजकीय नाटक संपण्याचे चित्र दिसत नाही. विधानसभा सभापती राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेत नाहीत, असा आरोप करत बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आमदारांच्या या भूमिकेवर कर्नाटक विधानसभा सभापती केआर. रमेश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Karnataka Assembly Speaker KR Ramesh Kumar: I felt hurt when I saw some news that I am delaying the process. Governor informed me on 6th. I was in office till then and later I left for personal work. Before that no MLAs informed that they were coming to meet me. pic.twitter.com/21bJGPe6It
— ANI (@ANI) July 11, 2019
६ जूलै रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत मी कार्यालयात होतो. आमदार कार्यालयात दुपारी २ वाजता आले होते. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर गेल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. ते येणार म्हणून बाहेर पडलो नव्हतो. त्यांनी भेटीची वेळ देखील घेतली नव्हती, असे विधानसभा सभापती केआर. रमेश कुमार यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदाराच्या राजीनाम्यासंदर्भातील निर्णय घेण्यास उशीर होत आहे, या वृत्ताने निराश झाल्याचेही ते यावेळी म्हणाले. संसदेतील एखाद्याचा बचाव करणे किंवा त्याला काढून टाकणे हे माझे काम नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मी कशाला राजीनामा देऊ?, त्यांनी दिला होता का?; कुमारस्वामींचा मार्मिक टोला
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस आणि जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक विधानसभेच्या सभापतींनी त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. न्यायालयाने या आमदारांना कर्नाटक विधानसभा सभापतींसमोर हजर राहण्यास सांगितले होते. राजीनाम्यासंदर्भात आजच निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाने सभापतींना दिला होता.