कर्नाटकमधील राजकीय नाट्य आता कमालीचे रंगले आहे. संकटात सापडलेल्या काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अल्पमतात येताना दिसत आहे. १३ आमदारांच्या राजीनाम्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनीही सरकारचा पाठिंबा काढला आहे. यावेळी सरकार वाचवण्याच्या अखेरच्या प्रयत्ना अंतर्गत कुमारस्वामी यांनी सर्व २१ मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. यामध्ये बंडखोर आमदारांची मनधरणी करणे आणि भावी मंत्रिमंडळात जागा देण्याची रणनिती असल्याचे बोलले जात आहे. स्वतः कुमारस्वामी हेही राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. बंडखोर आमदारांची कुमारस्वामींना नापसंती असल्याचे सांगण्यात येते. कॅबिनेटमध्ये लवकरच बदल होतील, असे टि्वट कुमारस्वामी यांनी केले आहे.
All ministers from #JDS have submitted their resignations just like the 21 ministers from #Congress.
— CM of Karnataka (@CMofKarnataka) July 8, 2019
Cabinet reshuffle will happen soon.
कर्नाटकी तिढाः भाजपची होऊ शकते 'वापसी'
#Karnataka Chief Minister and JD(S) leader HD Kumaraswamy: I don't have any kind of anxiety about the present political development. I don't want to discuss anything about politics. pic.twitter.com/qsidfRD5Cg
— ANI (@ANI) July 8, 2019
अपक्ष आमदाराने आपली भूमिका बदलल्यानंतर शनिवारपासून आतापर्यंत काँग्रेस-जेडीएसचे एकून १४ आमदार कमी झाले आहेत. सभागृहात आघाडीच्या आमदारांची संख्या १०४ झाली आहे. तर मुख्य विरोधी पक्ष भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार आहेत. अशात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. अपक्ष आमदार नागेश यांनी राज्यपालांना पत्र सादर करुन आपण काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून भाजपला देत असल्याचे म्हटले. राजीनाम्यानंतर ते थेट विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले.