पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुमारस्वामी यांच्या भवितव्याचा फैसला येत्या गुरुवारी

कुमारस्वामी

कर्नाटकमधील मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे आघाडी सरकार टिकणार की कोसळणार हे येत्या गुरुवारी स्पष्ट होईल. गुरुवारी कर्नाटकमधील विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा आणि मतदान होईल. विधीमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. सकाळी ११ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला सुरुवात होईल, असे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

साक्षी आणि अजितेश यांना एकत्र राहण्याचे कोर्टाचे आदेश

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १६ आमदारांनी सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे तेथील सरकार अडचणीत सापडले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात कुमारस्वामी यांनी आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाऊ असे स्पष्ट केले होते. बंडखोर आमदारांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेश कुमार यांच्याकडे दिला आहे. पण रमेश कुमार यांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. 

जर १६ बंडखोर आमदारांचे राजीनामे अध्यक्षांनी स्वीकारले, तर विधानसभेतील एकूण संख्याबळ २०९ पर्यंत खाली येईल. या स्थितीत काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारला बहुमतासाठी विधानसभेत १०५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असेल. सद्यस्थितीत त्यांच्याकडे केवळ १०१ आमदार आहेत. विरोधी पक्ष भाजपकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. त्याचबरोबर त्यांना दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

भाजपचाच मुख्यमंत्री होणार, सरोज पांडेंची पुन्हा युतीवर ठिणगी

विधानसभेच्या अध्यक्षांनी अद्याप बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले नसल्यामुळे तेथील सरकार वाचले आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Karnataka political crisis Kumaraswamy govt to face trust vote on Thursday says Congress Siddaramaiah