पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशभक्त मुसलमान भाजपला मतदान करतील, कर्नाटक मंत्र्यांचे वक्तव्य

के एस ईश्वरप्पा

देशभक्त मुसलमान हे भाजपला मतदान करतील तर पाकिस्तान समर्थक असे करण्यास मागेपुढे पाहतील, असे वक्तव्य कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी केले आहे. 

ते म्हणाले की, अखंड भारत व्हावा अशी प्रत्येकाची एक इच्छा आहे. हे शक्य होत नाहीये कारण त्यांना (विरोधक) मुसलमानांचे मत मिळू शकणार नाही अशी त्यांना भीती आहे. भाजप सत्तेत येण्यापूर्वी भाजपत येऊ इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या काही आमदारांना भेटलो होतो. पण त्यांचा दावा होता की, त्यांच्या मतदारसंघात ५० हजारहून अधिक मते ही मुस्लिमांची आहेत. जर ती मते गेली तर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

काश्मीरप्रकरणी पाठिंबा मागत असलेल्या पाकला मुस्लिम देशांचा सल्ला

शिवमोगा या आपल्या मतदारसंघात ५०,००० हजारांहून अधिक मुस्लिम मतदार असून मी त्यांना कधीच मत मागण्यास गेलो नसल्याचा दावा ईश्वरप्पा यांनी केला. मी त्या आमदारांना सांगितले की, माझ्या मतदारसंघात कुरुबाचे सुमारे ८ ते १० हजार मतदार आहेत आणि ५० हजारांहून अधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत. मी आजपर्यंत एकदाही मतासाठी मुसलमानांना सलाम केलेला नाही. मी ४७ हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेलो आहे. 

एक राष्ट्रभक्त मुसलमान भाजपला मतदान करेल आणि जो पाकिस्तान समर्थक आणि राष्ट्रद्रोही आहे, तो भाजपला मतदान करण्यास मागेपुढे पाहिल, असेही ते म्हणाले. यापूर्वीही ईश्वरप्पा यांनी अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची आत्महत्या