पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संस्थांवर छापे; ४.५२ कोटी जप्त

प्राप्तीकर विभागाचे छापे

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर आणि काँग्रेसचे माजी खासदार आर. एल जलप्पा यांचे सुपुत्र जे. राजेश यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईमध्ये प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत ४ कोटी ५२ लाख रुपये जप्त केले आहेत. प्राप्तीकर विभागाच्या ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला आहे.

वाहन उद्योगाचे बुरे दिन अद्याप कायम, विक्रीचा आलेख खालच्या दिशेने

मिळालेल्या माहितीनुसार, जी परमेश्वर यांचे कुटुंब सिध्दार्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. याची स्थापना त्यांचे वडील एच. एम. गंगाधैर्य यांनी ५८ वर्षापूर्वी केली होती. परमेश्वर याचे कार्यलय,  निवासस्थान आणि संस्थांवर छापे टाकण्यात आले आहेत. तपासामध्ये अधिकाऱ्यांनी त्यांचे भाऊ शिवप्रसाद आणि सहाय्यक परमेश्वर यांच्या घराची तपासणी केली. राजेंद्र हे दोद्दाबल्लापूर आणि कोलारा येथे इन्स्टिट्यूट चालवतात. 

मला जे योग्य वाटलं तेच मी केलं: राजनाथ सिंह

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेशी जोडलेल्या या प्रकरणात करोडो रुपयांचे कर चोरी केल्याप्रकरणी परमेश्वर आणि इतर जणांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी आणि राजस्थानमधील काही ठिकाणी असे एकूण ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी प्राप्तीकर विभागाचे ३०० पेक्षा अधिक अधिकारी सहाभागी होते. पोलिस देखील या कारवाईमध्ये सहभागी होते. 

'अयोध्येतील जागा मुस्लिमांनी राम मंदिरासाठी देऊन टाकावी'