पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिन्याभरात दुसऱ्या IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

एस शशिकांत सेंथील

सद्यस्थितीत सरकारमध्ये काम करीत राहणे नितीनियमांच्या विरोधात जाण्यासारखे होईल, असे सांगत कर्नाटकमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एस शशिकांत सेंथील (वय ४०) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा कर्नाटकमधील आयएएस अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

... या ४ कारणांमुळे भाजप-शिवसेनेत जागावाटपावर एकमत होणे अवघड

सेंथील हे २००९ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. ते मूळचे तामिळनाडूचे आहेत. तेथून त्यांनी अभियंता क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. 

काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देण्याच्या तयारीत

राजीनामा सादर करताना सेंथील यांनी म्हटले आहे की, प्रशासकीय सेवेत कार्यरत राहणे सद्यस्थितीत माझ्यासाठी नितीनियमांच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. वेगवेगळ्या विचारधारांना सामावून घेण्याचा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. पण सध्या त्याच्याशीच तडजोड केली जाते आहे. येणारे दिवस आणखी नवी आणि तीव्र आव्हाने घेऊन येणारे असतील, असे मला वाटते. त्यातून लोकशाहीच्या गाभ्याला धक्का लागू शकतो, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.