पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप किती दिवस सत्तेवर राहते हे आम्ही पण बघू - कुमारस्वामी

कर्नाटक विधानसभा

कर्नाटक विधानसभेत गुरुवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारला आपले बहुमत सभागृहात सिद्ध करावे लागणार आहे. राज्यपालांनी सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला दुपारी दीड वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपकडूनच आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही. पण तुमचे सरकार किती दिवस सत्तेवर राहते हे आम्ही पण बघू, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपच्या आमदारांनी गुरुवारी रात्रीपासून सभागृहातच धरणे आंदोलन केले. भाजप आमदार गुरुवारी रात्री सभागृहातच झोपले होते. 

कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देऊ - पाकिस्तान

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पत्र लिहिले असून, त्यांना शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या पत्रामध्ये राज्यपालांनी म्हटले आहे की, १५ आमदारांनी माझी भेट घेतली असून, त्यांचे राजीनामे सादर केले आहेत. दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या सर्व घडामोडी बघता सरकारकडे विधानसभेत बहुमत नाही, असे सकृतदर्शनी दिसते. 

कुमारस्वामी यांनी गुरुवारी सकाळी विधानसभेत एक ओळीचा विश्वास प्रस्ताव सादर केला. त्यावर चर्चेला सुरुवात झाली. पण त्यानंतर घडलेल्या विविध नाट्यमय घडामोडींनंतर प्रस्तावावर मतदान झालेच नाही. त्यातच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. 

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा मन्सूर खान अखेर भारतात

एकूण २० आमदार गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाला अनुपस्थित होते. यामध्ये १७ जण हे सत्ताधारी गटातील आहेत. काँग्रेस आणि जेडीएसचे १२ आमदार मुंबईतील एका खासगी हॉटेलात सध्या वास्तव्याला आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Karnataka floor test All eyes on Karnataka assembly as Governor sets 1 30 pm deadline for trust vote