पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी कशाला राजीनामा देऊ?, त्यांनी दिला होता का?; कुमारस्वामींचा मार्मिक टोला

एच डी कुमारस्वामी

तब्बल १६ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पेचात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी कशाला राजीनामा देऊ? त्याची गरज आहे का? असे प्रश्न त्यांनी पत्रकारांपुढेच उपस्थित केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कुमारस्वामी राजीनामा देतील, अशी चर्चा कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात होती. त्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे.

धोनीजी, निवृत्त होऊ नका! लतादीदींची भावनिक साद

कुमारस्वामी म्हणाले, पूर्वी १८ आमदारांनी बंडखोरी करीत राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा (येडियुरप्पा) पाठिंबा काढला होता. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता का?, अशीही आठवण कुमारस्वामी यांनी सांगितली. कर्नाटकमध्ये शुक्रवारपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आहे. या अधिवेशनाला आपण उपस्थित राहणार आहोत, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी २००८-०९ मध्ये भाजपचे १८ आमदार पक्षातून फुटले होते. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा यांना आपला पाठिंबा नसल्याचे सांगितले होते. त्यावेळी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला नव्हता, याकडे लक्ष वेधले.

दरम्यान, कुमारस्वामी यांनी गुरुवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे कर्नाटकातील प्रभारी के सी वेणूगोपाल, काँग्रेसचे गटनेते सिद्धरामय्या यांची भेट घेतली.