पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हिपच्या मुद्यावरुन येदियुरप्पा-सिद्धरामय्या यांच्यात शाब्दिक युद्ध

भाजप नेता येदियुरप्पा

काँग्रेस नेता सिद्धरामय्या आणि भाजप नेता येदियुरप्पा यांच्यात बंडखोर आमदारांना जारी केलेल्या व्हिपच्या मुद्यावरुन चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले.  विश्वासदर्शक ठरावासंदर्भातील चर्चेवेळी येदियुरप्पा यांनी बंडखोर नेत्यांना व्हिपचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेता सिद्धरमय्या यांच्यावर हल्ला चढवला.    

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर नेत्यांना व्हिपच्या माध्यमातून संरक्षण प्रदान केले आहे. त्यांनी विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायलाच पाहिजे, असे नाही. तुम्ही या मुद्याशी सहमत असा किंवा नाही, असे सांगत तुमच्या व्हिपला काही मूल्य नाही, अशा शब्दांत  येदियुरप्पांनी सिद्धरामय्या यांच्यावर तोफ डागली. 

कर्नाटकची जनता कुमारस्वामी सरकारला वैतागली होती : येदियुरप्पा  

यावर सिद्धरामय्या म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना व्हिप जारी करण्यासंदर्भात कोणताही आदेश दिलेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा हा अधिकार राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मी व्हिप जारी करु शकत नाही, असेही म्हटलेले नाही. व्हिप जारी करण्याचा अधिकार हा संविधानाने मला दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी तो कायम ठेवला आहे. 

Karnataka : काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळंल, ९९ विरुद्ध १०५ अशी 

काँग्रेसच्या १२ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकात राजकीय नाट्य रंगले होते. बंडखोर आमदारांच्या या निर्णयामुळे काँग्रेस-जेडीएसला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. मंगळवारी कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करता आले नाही. परिणामी काँग्रेस जेडीएस सरकार कोसळले. भाजप १०५ संख्याबळासह सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: karnataka crisis war of words between bs yeddyurappa and siddaramaiah over whip on rebel mlas