पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटक सरकारचा आज निर्णय, बंडखोर आमदार भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री परमेश्वर

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कायम राहणार की सत्तेतून बेदखल होणार याचा निर्णय आज होणार आहे. आज विधानसभेत कुमारस्वामी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे बंडखोर आमदार अजूनही आपल्या मतावर ठाम आहेत.

सरकार वाचवण्यासाठी अखेरचा प्रयत्नः कुमारस्वामी यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी अखेरच्या प्रयत्नाअंतर्गत रविवारी आघाडीच्या आमदारांची बंगळुरुतील ताज हॉटेलमध्ये बैठक घेतली. तर भाजप नेते बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी आघाडी सरकारचा अखेरचा दिवस असल्याचा पुनरुच्चार केला.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात, आता चर्चा खूप झाली

बंडखोर ठामः मुंबईत असलेल्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस-जेडीएसला धडा शिकवायचा असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, आम्ही येथे पैशाच्या लालसेपोटी किंवा दुसऱ्या अमिषासाठी आलेलो नाही. आमच्या निर्णयात भाजपची काहीच भूमिका नाही. एकदा सर्व व्यवस्थितीत झाल्यानंतर आम्ही बंगळुरुला परत जाऊ.

भाजप किती दिवस सत्तेवर राहते हे आम्ही पण बघू - कुमारस्वामी

अपक्ष आमदारांची न्यायालयात धावः दोन अपक्ष आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कर्नाटक सरकारला कोणत्याही परिस्थितीत सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. 

बसपा देऊ शकते साथः बसपा प्रमुख मायावती यांनी टि्वट करुन आपले एकमेव आमदार एन महेश यांनी विश्वास प्रस्तावादरम्यान सरकारला मतदान करण्यास सांगितले आहे. परंतु, आमदार महेश हे विश्वासदर्शक ठरावात सामील होणार नसल्याचे बोलण्यात येत आहे.

कर्नाटकात विश्वासदर्शक ठरावावेळी काय घडू शकते, तीन शक्यता