पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परत या अन्यथा परिणामाला सामोरे जा, सिद्धरामय्यांचा बंडखोरांना इशारा

सिद्धरामय्या

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारवर घोंगावत असलेल्या संकटादरम्यान माजी उपमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. बंडखोर आमदारांनी परत यावे अन्यथा याचे त्यांना परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले. 

कर्नाटक: काँग्रेसला आणखी एक धक्का, रोशन बेग यांचाही राजीनामा

काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते सिद्धरामय्या म्हणाले की, ज्या आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करु. 

दुसरीकडे, कर्नाटकमधील राजकीय घटना वेगाने घडत आहेत. राज्यसभेत कर्नाटकमधील परिस्थितीवर गोंधळ सुरु झाल्याने दुपारी २ पर्यंत कामकाज तहकुब करण्यात आले. तर लोकसभेतही काँग्रेसच्या खासदारांनी कर्नाटकमधील परिस्थितीचा निषेध करत सभात्याग केला. 

त्याचवेळी कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनीही राजीनामा दिला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांनीही पक्षविरोधी वक्तव्ये केली होती. पण ते राजीनामा देतील असे वाटत नव्हते. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. 

भाजपच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन्यासाठी बोलवण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस-जेडीएस सरकारचे संख्याबळ कमी झाले असून भाजपचे वाढले असल्याचा दावा त्यांनी केला.