पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटक संकटः शिवकुमार यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा 'यू-टर्न'?

काँग्रेस नेते शिवकुमार आणि बंडखोर आमदार एमटीबी नागराज  (Photo/DK Shivakumar ‘ Office)

कर्नाटकातील राजकीय हालचालीदरम्यान काँग्रेससाठी एक चांगली बातमी आली आहे. काँग्रेसचे संकटमोचक नेते डी के शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांची भेट घेतली असून या आमदारांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. 'आम्ही आमचा राजीनामा दिला होता. पण आता डी के शिवकुमार आणि इतर नेत्यांशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मी सुधाकर राव आणि इतर आमदारांशी चर्चा करेन आणि मग पाहू काय करता येईल', अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार एमटीबी नागराज यांनी दिली. 'अखेर मी अनेक दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये आहे', अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

शिवकुमार यांनी म्हटले की, 'आम्ही एकत्र राहिलो पाहिजे आणि एकत्रच प्राण द्यायला हवे. कारण आम्ही पक्षासाठी ४० वर्षे काम केले आहे. प्रत्येक कुटुंबात चढ-उतार येतात. सर्वकाही विसरुन आम्ही पुढे गेले पाहिजे. एमटीबी नागराज यांनी आमच्याबरोबर राहण्याचे आश्वासन दिले आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे.' 

दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यांनी राज्यातील सद्यस्थिती पाहता बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचे वक्तव्य केल्यानंतर भाजपने आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्या आमदारांना सोमवारी ती वेगवेगळ्या जागांवर तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला आहे.