पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : सगळ्यांसमोर सिद्धरामय्या यांनी सहायकाला कानशिलात लगावली

विमानतळाबाहेर सिद्धरामय्या आणि इतर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या यांनी त्यांच्यासोबत असलेल्या सहायकाला सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे. म्हैसूर विमानतळाबाहेर हा सगळा प्रकार घडला. सिद्धरामय्या यांनी सहायकाला का मारले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये सिद्धरामय्या सहायकाला कानशिलात लगावताना आणि त्याला हाताने दूर ढकलताना दिसत आहेत.

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबईची घसरण

म्हैसूर विमानतळाबाहेर सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर ते त्यांच्या गाडीकडे जात असताना त्यांच्यासोबत असलेल्या सहायकाला त्यांनी कानशिलात लगावली आणि त्याला हातानी दूर केले. परत त्याला आपल्या हातांनी काहीवेळ पकडून ते गाडीकडे घेऊन गेले.

कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत आहे. कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारीच अटक केली आहे.