पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकः येडियुरप्पांकडून विधानसभेत बहुमत सिद्ध

येडियुरप्पा

मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधानसभेत सोमवारी बहुमत सिद्ध केले आहे. येडियुरप्पा सरकारच्या बाजूने १०६ तर काँग्रेस-जेडीएस आघाडीला १०० मते मिळाली. बहुमतासाठी १०४ मतांची आवश्यकता होती. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष के आर रमेश यांनी रविवारी १४ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले होते. पण त्याचा विश्वासदर्शक ठरावावर परिणाम झाला नाही. येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध करु असा विश्वास यापूर्वीच व्यक्त केला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांचा विजय झाला आहे. कर्नाटकच्या रुपाने आता भाजपकडे आणकी एक राज्य आले आहे. 

तत्पूर्वी विश्वासदर्शक ठराव सादर करताना येडियुरप्पा म्हणाले की, प्रशासन अपयशी ठरले असून आम्ही त्याला योग्य करु. आम्ही सुडाचे राजकरण करणार नाही, असा विश्वास मी सभागृहाला देतो. शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले की, दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांना २००० रुपये दोन हप्त्यात देण्याचा मी निर्णय घेतला आहे. सर्वांनी मिळून काम करण्याचे मी विरोधकांना आवाहन करतो. 

कर्नाटकनंतर आता 'मिशन मध्य प्रदेश', भाजप नेत्याचे संकेत 

दुसरीकडे येडियुरप्पांच्या प्रस्तावाविरोधात काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण याबाबत काही खात्री देता येणार नाही. कारण बंडखोर आमदारांबरोबर ते आहेत. तुम्ही स्थिर सरकार कसे देणार ? हे अशक्य आहे ? मी विश्वासदर्शक ठरावाला विरोध करतो. कारण हे सरकार असंवैधानिक आणि अनैतिक आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पांना शुभेच्छाही दिल्या. 

अपात्र ठरविण्याविरोधात बंडखोर आमदार सुप्रीम कोर्टात जाणार