पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात, आता चर्चा खूप झाली

कर्नाटक विधानसभाध्यक्ष के आर रमेश  (ANI)

कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठरावावरुन अद्याप गोंधळ सुरु आहे. शुक्रवारी विधानसभेत काँग्रेस-जेडीएस सरकारने सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची मागणी केली आहे. ही मागणी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी फेटाळून लावत मला जगाचा सामना करावा लागतो, असे स्पष्ट म्हटले. मला आजच ही प्रक्रिया संपवायची आहे, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया ताणून धरल्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटकः १५ बंडखोर आमदारांसाठी आता काँग्रेस सुप्रीम कोर्टात

भाजप नेते सुरेशकुमार म्हणाले की, जर कार्यवाही लांबवली तर विश्वासदर्शक ठरावाचे महत्वच संपुष्टात येईल. त्यामुळे आजच सर्व प्रक्रिया पूर्ण केली जावी यावर त्यांनी जोर दिला. तर दुसरीकडे, काँग्रेस-जेडीएस नेत्यांनी सभागृह पुढच्या आठवड्यातील सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी नकार दिला. सत्ताधारी पक्षाच्या मागणीवर त्यांनी मला जगाचा सामना करायचा आहे, असे उत्तर दिले. 

भाजप किती दिवस सत्तेवर राहते हे आम्ही पण बघू - कुमारस्वामी

त्यानंतर रमेशकुमार यांनी विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली. विचार-विनिमय खूप झाला आहे. मला ही प्रक्रिया आज संपवायची आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी राज्यपालांनी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहून गुरुवारी विश्वासदर्शक ठराव करण्यास सांगितले होते. राज्यपालांच्या निर्देशानंतरही विधानसभाध्यक्षांनी सभागृहाची कार्यवाही स्थगित केली होती.