पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटक : सभापतींनी ३ बंडखोर आमदारांना ठरवलं अपात्र

कर्नाटक विधानसभा सभापती

कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर दोन दिवसांनी विधानसभा सभापती केआर रमेश यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे. रमेश ए जरकीहोली, महेश कुमथल्ली आणि आर शंकर अशी अपात्र ठरवलेल्या आमदारांची नावे आहेत.  

केआर रमेश म्हणाले की, बंडखोर आमदारांना प्रत्यक्षात उपस्थित राहण्याची संधी आता मिळणार नाही. हा अध्याय आता संपलेला आहे. देशातील कायदा हा सर्वांसाठी समान आहे. ते पुढे म्हणाले, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय न्यायालयाने माझ्या विवेकअधिकारावर सोडला आहे. त्यानुसारच मी काम करेन. सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेला विश्वास व्यर्थ ठरणार नाही. आमदारांसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी त्यांना नोटीस पाठवणार का? असा प्रश्नही सभापतींना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, माझ्याकडे एवढेच काम नाही. मी एकवेळा त्यांना बोलावले होते. ते आले नाहीत. मजूरापासून ते राष्ट्रपतींपर्यंत कायदा सर्वांसाठी सारखा आहे. 

कर्नाटकमधील भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत, सत्ता स्थापनेवर चर्चा

१५ बंडखोर आमदारांचे भविष्य टांगणीला असल्याने भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगबगीने हालाचीली केलेल्या नाहीत. विधानसभा सभापतींना आमदारांच्या राजीनामा आणि पार्टीमधून आयोग्य ठरवण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराखाली त्यांनी ३ आमदारांना अयोग्य घोषित केले आहे.