पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकः येडियुरप्पांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

बीएस येडियुरप्पा (AP photo)

कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पांना चौथ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंगळवारी एच डी कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर दोनच दिवसांत राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी येडियुरप्पा यांना कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. त्यांना ३१ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कर्नाटक विधानसभेतील सदस्यांची सध्या २२२ संख्या आहे. १४ आमदारांच्या राजीनाम्यावर अजून निर्णय व्हायचा आहे.

कर्नाटकः 'गुडलक'साठी येडियुरप्पांनी नावाचं स्पेलिंग बदललं

येडियुरप्पा यांना सभागृहात सर्व सदस्य उपस्थित राहिल्यास विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी ११२ आमदारांची गरज भासणार आहे. अशावेळी बंडखोर आमदारांना येडियुरप्पांच्या समर्थनात मत टाकावे लागेल किंवा सभागृहाच्या कामकाजात गैरहजेरी लावावी लागणार आहे. अशावेळी संख्याबळ कमी होईल आणि येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करता येईल.

दरम्यान, येडियुरप्पांनी शपथ घेण्यापूर्वी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. अंकशास्त्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी 'yeddyurappa' या इंग्रजी नावातील 'डी' हटवून 'आय' हा नवीन शब्द जोडून 'yediyurappa' असे केले आहे. 'yeddyurappa' हे नाव त्यांच्यासाठी शुभ ठरले नसल्याचे त्यांचे मत आहे. विशेषतः मागील तीन प्रयत्नांत त्यांना पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.