पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्षेपणास्त्रासाठीचे उपकरण घेऊन पाकिस्तानकडे निघालेले जहाज गुजरातजवळ ताब्यात

गुजरातमधील बंदर

क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारे उपकरण (ऑटोक्लेव्ह) घेऊन चीनमधून पाकिस्तानातील कासीम बंदराकडे निघालेले एक जहाज याच महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमधील कांडला बंदराजवळ तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. या जहाजावर हाँगकाँगचा ध्वज होता. त्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आणि उपकरणे आहेत, याची चुकीची माहिती देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमा शुल्क खात्याकडून ही कारवाई करण्यात आली. आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागण्यासाठी आटोक्लेव्ह या उपकरणाचा वापर केला जातो.

भगवान रामही भाजपची मदत करु शकले नाहीत, संजय राऊत यांचा टोला

या घटनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज ३ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले. कांडला बंदराजवळ थांबविण्यात आलेल्या या जहाजाची सध्या तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांची मदतही घेण्यात येत आहे. याच जहाजाची तपासणी करण्यासाठी डीआरडीओकडून अणू शास्त्रज्ञांचे एक पथकही पाठविण्यात येणार आहे.

चीनमधील जिआनजीन बंदरातून हे जहाज निघाले होते. ते पाकिस्तानमधील कासीम बंदराच्या दिशेने चालले होते. या जहाजाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देशातील राष्ट्रीय पातळीवरील सर्व तपास संस्थांना आणि गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जहाजाबद्दल कोणतीही माहिती राष्ट्रीय पातळीवरील तपास संस्थांकडून देण्यात आलेली नाही. पण हिंदुस्थान टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजाचे नाव दा कू यून असे आहे. त्याच्या हाँगकाँगचा ध्वज होता. 

कोरोना इफेक्ट: पेट्रोल आणखी ४ रुपयांनी स्वस्त होणार

गुप्तचर विभागाला या जहाजाबद्दलची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते ताब्यात घेण्यात आले. त्यावरील १८ X ४ मीटर लांबीच्या एका ऑटोक्लेव्हची तपासणी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.