पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छेडछाडीची तक्रार करणाऱ्या मुलीच्या चारित्र्यावर पोलिसानेच घेतला संशय

उत्तर प्रदेश पोलीस

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छेडछाडीची तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणीच्या चारित्र्यावरच पोलिसाने संशय घेतल्याची घटना घडली आहे. पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसाने तिची मदत करण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. या पोलिसाने तिच्या चारित्र्यावर संशय यासाठी घेतला कारण ती हातामध्ये अंगठी आणि गळ्यात सोन्याची साखळी घालून आली होती. ही घटना बुधवारी घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Japan Open 2019: सिंधू-प्रणीतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यावर त्यांनी असे म्हटले आहे की, 'छेडछाडीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणीला कशाप्रकारे वागणूक मिळत आहे. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधात गुन्हे कमी होत नाहीय. तर दुसरीकडे कायद्याचे रक्षणकर्ते अशाप्रकारे वागत आहेत. महिलांना न्याय मिळवून देण्याची पहिली पायरी म्हणजे ती जे सांगते ते ऐकूण घेणे.'

डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

घटना अशी आहे की, कानपूरच्या नजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी उभ्या असलेल्या तरुणांनी तिची छेड काढली. तरुणीने छेडछाडीला विरोध केला तर तिला मारहाण करण्यात आली. तिच्या बचावासाठी धावून आलेल्या तिच्या भावाला देखील या तरुणांनी मारहाण केली. त्यानंतर आईसोबत ही तरुणी पोलिस ठाण्यात तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिसाने तरुणीला आधी पूर्ण घटनाक्रम विचारला. 

UTT : पुणेरी पलटण सलामीच्या सामन्यात दबंग दिल्लीशी भिडणार

त्यानंतर, या पोलिसाने या तरुणीलाच उलटे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.' या बांगड्या, अंगठी, गळ्यात साखळी तू का घातली? ऐवढे दागिने घालण्याची काय गरज आहे? जर तू शिकत नाही तर हे सगळं घालण्याची काय गरज आहे? यातून तुला काय फायदा मिळतो? यातूनच दिसून येते की तू काय आहे? तर तरुणीच्या आईला देखील पोलिसाने सवाल केला की, तुम्ही तिचे कुटुंबिय आहेत तुमची मुलगी काय करते याकडे लक्ष देत नाही का? पोलिसाच्या या वागण्यामुळे तरुणी आणि तिच्या आईला धक्का बसला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

सगळा विचार करूनच आम्ही नव्या नेत्यांना पक्षात घेतो - उद्धव ठाकरे