पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलेश तिवारी हत्याः दोन्ही आरोपींना गुजरात-राजस्थान सीमेवरुन अटक

कमलेश तिवारी हत्याः आरोपी अश्फाक, मोईनुद्दीनला गुजरात-राजस्थान सीमेवरुन अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या पाचव्या दिवशी मुख्य आरोपी अश्फाक आणि मोईनुद्दीनला गुजरात एटीएसने अटक केली आहे. या दोघांना गुजरात-राजस्थान सीमेवर अटक केली आहे. तत्पूर्वी गुजरातच्या तीन आरोपींना लखनऊच्या न्यायालयात सादर केले गेले. त्यानंतर कट रचणाऱ्या तिघांना ४ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

कमलेश तिवारी हत्याःमिठाईच्या डब्यावरुन गूढ उलगडलं, तिघे अटकेत

गुजरात एटीएस डीआयजी हिमांशु शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक बी पी रोजिया, सहायक आयुक्त बी एस चावडा आणि इतर अधिकाऱ्यांनी कमलेश तिवारींच्या हत्येप्रकरणी अश्फाक हुसेन जाकिर हुसेन शेख (३४) आणि मोईनुद्दीनला अटक केली. अश्फाक हा सुरतमधील लिंबायत येथील ग्रीन व्ह्यू अपार्टमेंटमध्ये राहणारा आहे. तर मोईनुद्दीन खुर्शीद पठाण उमारवाडा येथील लो कास्ट कॉलनी, सूरत येथील रहिवासी आहे. अश्फाक हा व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधी आहे तर मोईनुद्दीन फूड डिलिव्हरी बॉयचे काम करतो.