पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ यांचा राजीनाम्याचा निर्णय, भाजपवर टीका

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनी त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. काँग्रेसच्या २३ आमदारांचे राजीनामे याआधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारले आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  

राज्यात आणखी तिघांना कोरोना, पाच जणांना डिस्चार्ज

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २३ आमदारांनी बंडखोरी करीत आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. यामध्ये कमलनाथ यांच्या सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील हे आमदार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी राजीनामे दिले होते. या घटनेनंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे सरकार अडचणीत आले आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या अध्यक्षांनी या आमदारांचे राजीनामे मंजूर केले आहेत. त्यामुळे या स्थितीत कमलनाथ यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट झाले होते.

गूड न्यूज : भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण तुलनेत तूर्त कमी

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात कमलनाथ सरकारला शुक्रवारी आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. एकीकडे काँग्रेसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे आणि दुसरीकडे बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यामुळे कमलनाथ यांनी शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.