पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जे ऐतिहासिक सत्य होते, तेच बोललो';'हिंदू दहशतवादी' वक्तव्यावर कमल हासन ठाम

कमल हासन

स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता, या आपल्या वक्तव्यावर मक्कल नीधी मयम (MNM) पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन ठाम आहेत. या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कमल हासन यांनी बुधवारी आपण जे बोललो ते ऐतिहासिक सत्य होते असे म्हटले आहे. विरोधकांनी वैध आरोप करावेत. राजकारणात जेव्हा आपण येतो तेव्हा समाजातील केवळ एकाच घटकाचाच विचार केला पाहिजे का असा सवाल केला. मी अरवाकुरुचीमध्ये जे म्हटलो, त्यामुळे ते नाराज झाले आहेत. मी जे काही म्हटले होते ते एक ऐतिहासिक सत्य आहे. मी कोणाला भांडण्यासाठी चिथावणी देत नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माझे वक्तव्य हिंदूविरोधी असल्याचे पसरवले जात आहे - कमल हासन

'भाषा' या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सत्य विजयी असते. मी ऐतिहासिक सत्य बोललो आहे. कट्टरवादाचा अर्थ समजून घ्या. मी (गोडसेंविरोधात) दहशतवादी किंवा मारेकरी या शब्दांचा वापर करु शकलो असतो. आपण सक्रिय राजकारणात आहोत. कोणतीही हिंसा होणार नाही. माझ्या वक्तव्यातील काही निवडक भाग संपादित केला गेला. माझ्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये माध्यमातील माझे मित्रही जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. 

राजकीय स्वार्थासाठी सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवलं जातंय- शरद पोंक्षे

तत्पूर्वी, कमल हासन यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर खुलासा केला होता. मी केवळ धार्मिक असहिष्णूतेबद्दल बोलत होतो. कट्टरता मग ती कोणत्याही धर्मातील असू दे त्याचा निषेधच केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

'कमल हासन यांची जीभच कापली पाहिजे'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kamal Haasan Breaks silence over his Statement First terrorist was Hindu in Independent India