पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकनंतर आता 'मिशन मध्य प्रदेश', भाजप नेत्याचे संकेत

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर भाजप आता मध्य प्रदेशमध्ये 'ऑपरेशन लोट्स' सुरु करण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी कर्नाटकात मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर पक्ष नवीन अभियान सुरु करणार असल्याचा दावा केला आहे. मध्य प्रदेशमधील राजकीय स्थितीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी भाजपचा मनसुबा सांगून टाकला. दरम्यान, गत आठवड्यात मंगळवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्याने काँग्रेस-जेडीएस सरकारला पायउतार व्हावे लागले होते. 

आई मुलाचा मुका घेते, तोही सेक्सच का?, जीतन राम मांझी यांचे विधान

'कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर नवीन अभियानाची सुरुवात केली जाईल. मध्य प्रदेशचे सरकार पडावे, अशी आमची इच्छा नाही. पण काँग्रेसच्या आमदारांमध्येही अनिश्चितता आहे. काँग्रेसच्या आमदारांना आपल्याच सरकारवर भरवसा नाही. तिथे सध्या गटबाजीची स्थिती आहे,' असे विजयवर्गीय म्हणाले. ते जयपूर येथे बोलत होते.

काँग्रेसच्या आमदारांना आपल्या सरकारवर विश्वास नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व चांगले असल्याचे मानतात. कर्नाटकातील काँग्रेस सरकार आपल्या कर्मामुळे पडले आहे, असा टोला ही त्यांनी लगावला.

'२०२४ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था'

दरम्यान, विजयवर्गीय यांनी जरी मध्य प्रदेशमध्ये 'मिशन लोट्स' सुरु करण्याचे संकेत दिले असले तरी तिथे भाजपच्या २ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मध्य प्रदेशमध्ये 'दंड विधी दुरुस्ती विधेयका'वर भाजपच्या २ आमदारांनी कमलनाथ सरकारला मतदान केले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kailash Vijayvargiya Hint new mission For Madhya Pradesh After Karnataka Cabinet Formation