पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य शिंदेंच्या जमीन घोटाळा प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू

ज्योतिरादित्य शिंदे

काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखा या घोटाळा प्रकरणाची चौकशी करत आहे. हे प्रकरण १० हजार कोटी जमीन घोटाळ्याचे आहे. ज्योतिरादित्य शिंदेंवर एकच जमीन अनेक वेळा विकल्याचा आरोप आहे. त्याचसोबत सरकारी जमीन विकल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे. २०१४ मध्ये या प्रकरणाचा तपास झाला होता. 

कोरोनामुळे देशापुढे मोठे संकट, पण सरकार गुंगीतच; राहुल गांधींची टीका

भाजपमध्ये प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्वासाठी चांगले वातावरण नाही. मध्य प्रदेशच्या काँग्रेस सरकारवर देखील त्यांनी यावेळी आरोप केले. सरकार शेतकरी आणि तरुणांना दिलेले आश्वासन पूर्ण करु शकली नाही. तसंच त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. 

सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, चिंता कायम

दरम्यान, १९६७ मध्ये काँग्रेसने माझ्या आजीला डावलले. त्याचप्रमाणे त्यांनी मला सुध्दा डावलले, असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला आशिर्वाद देत भाजपमध्ये संधी दिली. याबद्दल त्यांनी पंतप्रधानानांचे आभार मानले. शिवराज सिंह यांच्यासोबत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने जोमाने काम करु, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. 

इराणमध्ये स्थिती चिंताजनक, कबर खोदण्याचे काम मोठ्या प्रमाणात