पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

ज्योतिरादित्य शिंदे

काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे मंगळवारी संध्याकाळीच औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजकीय घडामोडींशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. अर्थात याबद्दल अधिकृतपणे भाजपकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा तिथे उपस्थित होते. 

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर, आणखी काही निरीक्षणाखाली

भाजपचे राज्यसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी संध्याकाळी होणार आहे. त्यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समजली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपकडून मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार आहे, अशीही माहिती मिळाली आहे.

कोरोना: यंदा पैठणमध्ये नाथषष्टी यात्रा भरणार नाही

पक्षामध्ये औपचारिक प्रवेश केल्यानंतरच ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव राज्यसभेसाठी औपचारिकपणे निश्चित केले जाईल. मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी प्रत्येकी एका-एका जागेवर काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. उर्वरित एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होईल.