पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही दिला राजीनामा

ज्योतिरादित्य सिंधिया

काँग्रेसमधील राजीनामा सत्रात आता आणखी एका मोठ्या नेत्याच्या नावाची भर पडली आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरचिणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्विवटरवरून राजीनाम्याची माहिती दिली आहे. यापूर्वी मलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय शनिवारी काँग्रेस नेते केशवचंद यादव यांनी भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र! मिलिंद देवरा यांचा पदत्याग

ट्विटरच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती देताना सिंधिया यांनी लिहिलंय की, लोकसभेच्या पराभवाला मी जबाबदार असून त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल गांधींचा आभारी आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे.