पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य शिंदें यांच्या टि्वटर परिचयातून काँग्रेस 'गायब'

ज्योतिरादित्य शिंदे

मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते आणि काँग्रेसचे माजी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीवरुन उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. सोमवारी शिंदे यांनी टि्वटर अकाऊंटवरील आपल्या परिचयातून काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. त्यांनी स्वतःचा जनसेवक आणि क्रिकेटप्रेमी असा उल्लेख केला आहे. दरम्यान, त्यांनी काँग्रेस सोडण्याबाबतचे अंदाज फेटाळले आहेत. 

'अजितदादा म्हणाले, भाजप-NCPचे सरकार बनणार आहे, तुम्ही या'

टि्वटरवर आपल्या परिचयातून काँग्रेसचा उल्लेख हटवण्याबाबत ज्योतिरादित्य म्हणाले की, मी माझ्या परिचयात सुमारे एक महिन्यापूर्वी बदल केला होता. लोकांच्या सल्ल्यानंतर मी परिचय छोटा केला होता. आता यावरुन अफवा निर्माण केल्या जात आहेत. त्या पूर्णपणे निराधार आहेत. 

लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यापासून पक्षात ज्योतिरादित्यांची उपेक्षा केली जात असल्याचे बोलले जाते. ऑगस्टमध्ये शिंदे यांच्या नाराजीमुळे आणि त्यांच्या समर्थकांच्या राजीनाम्याच्या धमकीमुळे मुख्यमंत्री कमलनाथ स्वतः सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मुलाखतीनंतर कमलनाथ यांनी सर्व काही ठीक आहे असे म्हटले होते.

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचा घणाघाती आरोप

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या टि्वटरवरील परिचय हा काँग्रेस सरचिटणीस, गुना लोकसभा मतदारसंघाचे खासदार (२००२-२०१९ पर्यंत) आणि माजी केंद्रीय मंत्री असा होता. आता त्यांनी तो परिचय हटवून स्वतःला समाजसेवक आणि क्रिकेटप्रेमी असे म्हटले आहे.