पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः सुनावणीदरम्यान न्या. भानुमती यांना आली भोवळ

सर्वोच्च न्यायालय

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान न्या. आर भानुमती यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना त्वरीत त्यांच्या चेंबरमध्ये नेण्यात आले. 

न्या. भानुमती यांना भोवळ आल्याने खंडपीठाने हे प्रकरण स्थगित केले. आता न्यायालय नंतर आदेश देईल. न्या. आर भानुमती यांना खूप ताप होता, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. चेंबरमध्ये डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. 

धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईनः राज ठाकरे

दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी विनय शर्माचा आणखी एक प्रयत्न अपयशी ठरला आहे. राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत विनयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. स्वतःला मनोरुग्ण सांगत फाशी टाळण्याची त्याने मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सांगितले. न्यायालयाने सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Justice R Banumathi fainted during the hearing in 2012 Delhi gang rape case in Supreme Court