पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरन्यायाधीशांविरोधातील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीतून न्या. रमणा यांची माघार

सर्वोच्च न्यायालय

देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीतून न्या. एन. व्ही रमणा यांनी माघार घेतली आहे. आरोप करणाऱ्या महिलेने या समितीत एन. व्ही. रमणा यांचा समावेश करण्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांनी गुरुवारी समितीतून माघार घेतली.

सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी न्या. एस. ए. बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कालच या समितीची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्या. रमणा यांनी त्यातून माघार घेतली. 

सरन्यायाधीशांविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने संबंधित समितीला पत्र लिहून न्या. रमणा यांचा समावेश करण्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांनी समितीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.