पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्याय बदल्याच्या भावनेतून दिला जाऊ नये, CJI बोबडे यांचे सूचक वक्तव्य

सरन्यायाधीश शरद बोबडे

हैदराबादमधील एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांच्या चकमकीत खात्मा झाला. चकमकीनंतर देशात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. एका गटाकडून पोलिसांचे मोठे कौतुक केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूने या चकमकीवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी आता सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीही वक्तव्य केले आहे. जर बदल्याच्या भावनेतून न्याय दिला गेला असेल तर तो न्याय होऊ शकत नाही. जर बदल्याच्या भावनेने हे केले गेले तर न्याय आपले चरित्र हरवून बसतो, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी अॅडव्होकेट जी एस मणी आणि प्रदीपकुमार यादव यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी न्यायालयाच्या वर्ष २०१४ च्या निर्देशांचे पालन केले नसल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. कारवाईत सामील झालेल्या पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करावेत आणि त्यांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी सोमवारी सुनावनी होणार आहे.

हैदराबाद एनकाऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार आरोपी-शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ यांचा चकमकीत खात्मा झाला होता. या आरोपींना गुन्हा ज्याठिकाणी घडला होता. त्याठिकाणी त्यांना आणले होते. त्यावेळी पोलिसांचे हत्यार हिसकावून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चौघे मारले गेले.

'भाजपला उतरती कळा लागल्याचे महाराष्ट्रातील निकालातून स्पष्ट'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Justice must never take form of revenge Chief Justice of India SA Bobde a day after Hyderabad encounter