पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी न्या. लोकूर फिजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी

न्या.मदन लोकूर

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी सोमवारी फिजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. ते फिजीत अप्रवासी पॅनलचा भाग असतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. फिजीचे राष्ट्रपती जिओजी कानरोते यांनी कार्यकारी मुख्य न्यायाधीश कमल कुमार यांच्या उपस्थितीत न्या. लोकुर यांना शपथ दिली. भारतीय न्यायमूर्ती दुसऱ्या देशाच्या प्रमुख न्यायालयात न्यायमूर्ती बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी १२ जानेवारी २०१८ मध्ये पहिल्यांदा पत्र परिषद घेतली होती. त्यात न्या. लोकूर हेही होते. 

सिक्कीममध्ये भाजपला मोठे यश; एसडीएफचे १० आमदार भाजपमध्ये

न्या. लोकुर यांनी जुलै १९७७ मध्ये वकिली सुरू केली होती. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. जुलै १९९९ मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. गुवाहाटी व आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायमूर्ती होते. जून २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला ते निवृत्त झाले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी १२ जानेवारी २०१८ मध्ये पहिल्यांदा पत्र परिषद घेतली होती. त्यात न्या. लोकूर हेही होते. या चौघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत तत्कालनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

जम्मू-काश्मीरःएका रात्रीत काही बदलणार नाही, सरकारवर भरवसा ठेवावा लागेल-सुप्रीम कोर्ट